प्रा. दीपक ताटपुजे यांच्या करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील दोन दशकांच्या वाटचालीच्या निमित्ताने विद्यादीप फाऊंडेशनचा विशेष उपक्रम........ |
|
करिअर व्याख्याने:
५०० व्याख्यानांचा टप्पा पूर्ण |
करिअर
संवाद जागतिक मुक्त बाजारपेठ संकल्पनेमुळे गेल्या दशकात करिअर नियोजनाला अनन्यसाधारण महत्व आले आहे. बौध्दीक संपदा क्षेत्रात जगावर अधिराज्य करण्याच्या हेतुनेच युरोपीय व अन्य देशांनी शैक्षणिक प्रक्रियेसा महत्व देऊन करिअर नियोजना क्षेत्रात संशोधन करुन त्याला सामाजिक परिणाम देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला आहे. शैक्षणिक क्षेत्रात दबदबा असलेल्या ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांना समक्ष भेट देऊन करिअर नियोजनाची स्वतंत्र यंत्रणा अभ्यासल्यानंतर आपल्या देशातील विद्यार्थी यांना मराठी माध्यमातुन हा उपक्रम प्रदीर्घ अभ्यासानंतर वेळोवेळी विकसित केला आहे. मुलभूत शैक्षणिक अभ्यासक्रमास अनुरुप पुरक अभ्यासक्रमाची निवडही येत्या काळात कालबाह्य होण्याची शक्यता निर्माण झाली असुन त्याला आंतरशाखीय (इंटर डिसीप्लीनरी) अभ्यासक्रमांची निवड आवश्यक ठरणार आहे. यामुळेच मुलभूत अभ्यासक्रमाचे पर्याय देणारे करिअर मॅपची आखणी आवश्यक आहे. करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील माझ्या दोन दशकांच्या वाटचालीत अनेक बदल अभ्यासून करिअर मॅपची रचना पाच मुलभूत कौशल्यांवर, विविध अनेक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध केली आहे. जागतिक स्तरावर मल्टीनॅशनल कंपन्यांमधुन आवश्यक असणारी विविध कौशल्ये यात समाविष्ट आहेत. आजपर्यंत आपण अनेक उपक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे त्या बद्दल धन्यवाद........... प्रा. दीपक ताटपुजे, करिअर मार्गदर्शन विषयाचे अभ्यासक |
![]() website counter |
संपर्क: विद्यादीप
फाऊंडेशन,
गुरुविद्या, १२१-अ, यादोगोपाळ पेठ, सातारा-४१५००२ सेल नंबरः ९८९०९६०८१६
फोन-०२१६२२८०३३६ नोंदणी कार्यालय: एफ-६, यशश्री अपार्टमेंट, ८०-अ, यादोगोपाळ पेठ, सातारा-४१५००२ फोन-०२१६२२८४२८४ सेल नंबरः९४२२०३८४०३ |
तंत्रज्ञान
सहाय्य |